पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नी आणि मुलासह सपा खासदार आजम खान यांची रवानगी तुरुंगात

आजम खान

फसवणूक प्रकरणामध्ये रामपूर येथील समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. अजामीनपात्र अटक वारंट जारी केल्यानंतर आझम खान, त्यांची पत्नी ताजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांनी बुधवारी रामपूरच्या विशेष न्यायालयात शरणागती पत्कारली. त्यानंतर न्यायालयाने तिघांना २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

अजित डोवाल यांच्याकडून दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी

मुलगा अब्दुल्लाचे दोन जन्म प्रमाणपत्र तयार केल्यासह इतर अनेक खटल्या प्रकरणी आजम खान यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा आज न्यायालयात हजर झाले होते. आजम खान यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळून लावली. त्यानंतर न्यायालयाने तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली. जामीनासाठी आजम खान यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. 
स्टीव्हच्या चेहऱ्यावर पुन्हा 'कॅप्टन्सी'चं स्मित हास्य दिसणार

दरम्यान, भाजप नेता आकाश सक्सेना यांनी आजम खान, अब्दुल्ला खान आणि तजीन फातिमा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये फायद्यासाठी खासदार आजम खान आणि त्यांची पत्नी तनीज फातिमा यांनी मुलगा अब्दुल्ला आजम याचे दोन जन्म प्रमाणपत्र तयार करुन घेतले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याप्ररकरणी वारंवार समन्स बजावून देखील हजर न राहिल्यामुळे तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले होते. 

हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत