पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी.चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ

पी चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणातील चिदंबरम यांच्याविरोधातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर सीबीआय कोर्टाने त्यांच्या कोठडीत ४ दिवसांनी वाढ केली. ३० ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.  

VIDEO : मोदी-ट्रम्प यांच्या भेटीतील 'दे टाळी' क्षण

सोमवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आल. चिदंबरम यांची अधिक चौकशी करण्यासाठी ५ दिवसांच्या कोठडीची मागणी सीबीआयने केली होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयची बाजू मांडताना चौकशी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे कोर्टात सांगितले. मेहता यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने चिदंबरम यांच्या कोठडीत ३० ऑगस्टपर्यंत वाढ केली. येत्या ४८ तासांत चिदंबरम यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. 

चिदंबरम यांना झटका, दिल्ली हायकोर्टच्या आदेशाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामी नाकारल्याच्या आदेशाविरोधात चिदंबरम यांच्याकडून दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. तसेच ईडीच्या प्रकरणात कोर्टाने चिदंबरम यांच्या अटकेची मुदत एका दिवसाने वाढवली आहे. ईडीकडून होणाऱ्या अटकेच्या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:special cbi court extends cbi remand of p chidambaram by 4 days in connection with inx media case