पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणू : ३२४ भारतीयांना चीनमधून विशेष विमानानं परत आणले

३२४ भारतीयांना विशेष विमानानं भारतात आणले

चीनमधून ३२४ भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं शनिवारी सकाळी भारतात परत आणण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे परिस्थिती भीषण आहे. आतापर्यंत चीनमध्ये २५९ लोक कोरोनामुळे दगावले आहेत. चीनमधील वुहान प्रांतात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहे. वुहान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक भारतीय अडकून होते. कोरोनामुळे खबरदारी म्हणून कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आणि नागरीकांनी भारतात परत येण्याची सोय करावी यासाठी विनंती केली होती. 

कोरोनाच्या भीतीनं ७ हजार प्रवासी आलिशान जहाजातच

त्यानंतर भारतानं चीनमध्ये असलेल्या सहाशेहून अधिक भारतीयांना परत आणण्याची मोहीम  आखली. दोन विमानानं भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा शनिवारी सकाळी पार पडला. शुक्रवारी  राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टरांचे ५ जणांचे विशेष पथक आणि २० कर्मचाऱ्यांचा चमू चीनमध्ये विशेष विमानानं दाखल झाला. त्यांच्यासोबत औषधं, सुरक्षेसाठी मास्क आणि अन्न होतं. शनिवारी ३२४ भारतीयांना घेऊन  विशेष विमान नवी दिल्लीत परत आलं. या भारतीयांची आरोग्याची तपासणी केली जाणार आहे. त्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत सुरक्षित विभागात ठेवण्यात येणार आहे. 

कोरोना विषाणू : ... म्हणून गूगलने आपल्या सर्च रिझल्टमध्ये केला बदल

''विशेष विमानात सेवा पुरवण्यात आली नव्हती. अन्न पाण्याची सोय प्रत्येक प्रवाशांच्या जागेवरच करण्यात आली होती. त्यांचे अन्न आसनाजवळ असलेल्या पॉकेटमध्ये ठेवण्यात आलं होतं. विमानसेवाच्या कर्मचाऱ्यांची प्रवाशांसोबत बातचीत झाली नाही, असं, एअर इंडियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांनी सांगितलं.