रोजच्या रोज संस्कृतमधून संवाद साधल्यास मधुमेह आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो, असे संशोधन अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेत झाल्याचे भाजपचे खासदार गणेश सिंग यांनी लोकसभेत सांगितले. संस्कृत विद्यापीठ विधेयकावरील चर्चेत सहभाग घेताना त्यांनी हे विधान केले.
अबब! नाताळनिमित्त प्रत्येक कर्मचाऱ्याला ३५ लाख रुपयांचा बोनस
गणेश सिंग यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने (नासा) केलेल्या एका सशोधनानुसार जर कॉम्प्युटरचे प्रोग्रॅमिंग संस्कृतमध्ये केले असते तर त्यामध्ये कोणतीही गडबड झाली नसती. जगभारत बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी ९७ टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहे. यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश आहे, असे गणेश सिंग यांनी सांगितले.
'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'
केंद्रीय मंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी या विधेयकावर भूमिका मांडताना संस्कृतमधून भाषण केले. ते म्हणाले, इंग्रजीतील ब्रदर, काऊ हे शब्द संस्कृतमधून आले आहेत. या भाषेचा प्रचार-प्रसार केल्यास इतर भाषांवर कोणताही परिणाम होणार नाही.