पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हातात असतानाच 'आयफोन ६'ने घेतला पेट

आयफोन

कॅलिफोर्नियामध्ये 'आयफोन ६'ने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. एका ११ वर्षांच्या मुलीच्या हातात हा फोन होता. त्यावेळीच त्याने पेट घेतला. मुलीने लगेचच तो बेडवरील ब्लॅँकेटवर फेकला. त्यामुळे ब्लॅकेटलाही भोकं पडली आहेत. काही इंग्रजी माध्यमांनी ही माहिती दिली आहे.

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला जाणार

संबंधित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, मी बेडजवळ बसले होते. माझ्या हातात माझा फोन होता. अचानक त्यातून ज्वाळा बाहेर आल्याचे मला दिसले. मी लगेचच तो फोन समोरच्या बेडवरील ब्लँकेटवर फेकून दिला. यामुळे ब्लँकेटलाही भोकं पडली. 

संबंधित मुलीची आई मारिआ अदाता यांनी सांगितले की, आम्ही ऍपल कंपनीच्या कस्टमर केअर सेंटरला फोन केला. त्यांनी आम्हाला तो फोन आणि घटनास्थळाची छायाचित्रे पाठविण्यास सांगितली आहेत. फोन जळाल्यामुळे माझ्या मुलीला फार मोठी दुखापत झाली नाही, हेच विशेष म्हणायला हवे.

खर्गे, आझादांना भेटायंच नाहीये; बंडखोर आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र

ऍपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, फोनला आग लागण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. काहीवेळा अनधिकृत चार्जिंग केबल वापरल्यामुळे किंवा चार्जर वापरल्यामुळेही तो पेट घेऊ शकतो.