पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोर्टात मोबाइलची रिंग वाजली, सपा आमदाराला तीन तासांची कोठडी

कोर्टात मोबाइलची रिंग वाजली, सपा आमदाराला तीन तासांची कोठडी

मुरादाबादमधील कुंदरकी येथील समाजवादी पक्षाचे आमदार हाजी रिजवान यांना केवळ एका चुकीमुळे कोठडीत राहावे लागले. न्यायालयाने त्यांना तीन तासांनंतर मुक्त केले.

अरे उद्धवा! तेव्हा १ रुपयांत आरोग्य तपासणी का नाही केली?

झाले असे की, शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आमदार रिजवान यांना १२ वर्षांपूर्वीच्या एका खटल्याप्रकरणी समन्स बजावले होते. आमदारांवर एप्रिल २००७ मध्ये मतदान करण्यास विरोध केल्याचा आरोप आहे. 

मला देशातला खलनायक ठरवलं- राज ठाकरे

मतदान करण्यास विरोध करत काठीने मारहाण केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. गंभीर कलमे लावण्यात आलेल्या आमदार रिजवान यांना २००८ मध्ये उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. जेव्हा शनिवारी याची सुनावणी सुरु झाली. त्याचवेळी आमदारांना एक फोन आला. त्यावेळी नाराज न्यायालयाने आमदाराला कोठडीत आणण्याचे आदेश दिले. कोठडीत राहिल्यानंतर तीन तासांनंतर सोडून देण्यात आले.

'पी. चिदंबरम आणि पुत्र कार्तीला ५० लाख डॉलरची लाच दिली'