पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उ. कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर, अमेरिकी माध्यमांचे वृत्त

किम जोंग उन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किम जोंग उन हे गंभीर असल्याचे वृत्त काही अमेरिकी माध्यमांनी दिले आहे. दक्षिण कोरियाकडून या संदर्भातील वृत्तांची माहिती घेण्यात येत आहे. या वृत्ताला अधिकृतपणे कोणताही दुजोरा मिळालेला नाही.

राष्ट्रपती भवनात कोरोनाचा रुग्ण, १२५ कुटुंब क्वारंटाईन

काही अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची तब्येत खालावली. काही माध्यमांनी त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आल्याचे म्हटले आहे. पण त्यालाही दुजोरा मिळालेला नाही. 

दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंधाचा विषय हाताळणाऱ्या दक्षिण कोरियातील मंत्रालयाने अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, डेली एनके या माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग उन यांची तब्येत आता सुधारत आहे. त्यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली. पण आता त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे.

मुंबईत या व्यक्तींना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नाही- आरोग्यमंत्री

उत्तर कोरियाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे आणि किमचे आजोबा किम इल संग यांच्या जयंतीनिमित्त १५ एप्रिलला आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमाला किम जोंग उन अनुपस्थित राहिले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चेला सुरुवात झाली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:South Korea looking into reports of North Korean leader Kim Jong Uns fragile condition after surgery