पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारताविरुद्ध मैदानात उतरण्यास उत्सुक : रबाडा

रबाडा

कर्णधार क्विंटन डी कॉक च्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ शनिवारी भारतामध्ये दाखल झाला. १५ सप्टेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका रंगणार आहे.  
दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडाने ट्विटच्या माध्यमातून भारतात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त केलाय.

Under 19 Asia Cup : पाकचा धुव्वा उडवत युवा टीम इंडिया

भारताविरुद्ध पुन्हा मैदानात उतरण्यासाठी उत्सुक असल्याचा उल्लेखही त्याने आपल्या ट्विटमध्ये केलाय.
१५ सप्टेंबरला धर्मशाळाच्या मैदानात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीचा सामना खेळवण्यात येणार असून १८ सप्टेंबरला मोहाली आणि २२ सप्टेंबरला बंगळुरुच्या मैदानात मालिकेतील अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. टी-२० मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेने आपल्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात करेल.  

'थ्रीडी गॉगल'च्या ट्विटचा पश्चाताप नाही : रायडू

भारत दक्षिण आफ्रिका कसोटी वेळापत्रक
२ ते ६ ऑक्टोबरला पहिला कसोटी सामना (विशाखापट्टणम)
१० ते १४ ऑक्टोबरला दुसरा कसोटी सामना (पुणे)
१९ ते २३ ऑक्टोबरला  तिसरा कसोटी सामना (रांची)