पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनिया गांधींचा देशवासियांना संदेश, कोरोनाच्या लढाईत काँग्रेस तुमच्यासोबत

सोनिया गांधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोदी सरकारने घोषीत केलेल्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार आहे. त्याआधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत सर्व भारतीय एकत्र आहेत, यापेक्षा मोठी देशभक्ती नाही, असे सोनिया गांधींनी सांगितले. 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा १० हजार पार, ३३९ रुग्णांचा मृत्यू

सोनिया गांधी यांनी सांगितले की, कोरोनाच्या संकटात तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित असाल. या संकटाच्या वेळी शांती, धैर्य आणि संयम राखणाऱ्या सर्व देशवासियांचे मनापासून आभार मानते. तुम्ही सर्व जण लॉकडाऊनच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत असला अशी आशा मी बाळगते. सर्व जण घरामध्येच रहा, वेळोवेळी आपले हात धुवा, गरज असेल तरच घराबाहेर पडा, यावेळी मास्कचा वापर करा. तसंच, या कोरोनाविरोधातील लढाईत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सोनिया गांधींनी केले आहे. 

जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या १६ जणांना कोरोना

'आज कोरोनाविरोधातील लढाईत तुम्ही सर्वजण उभे राहिले आहेत यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते? आम्ही या कठीण परिस्थितीत तमचे कुटुंब, पती, पत्नी, मुलं, आई-वडील यांचे बलिदान आणि त्याग कधीही विसरू शकत नाही. जोखीम असूनही, केवळ आपल्या सहकार्यामुळे आणि समर्पणामुळेच ही लढाई लढण्यास सक्षम आहात. त्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत.', असे सोनिया गांधींनी सांगितले. 

३५२ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २,३३४ वर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sonia gandhi thanks coronavirus warriors in video message ahead of pm modi address to nation on lockdown