पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तयारी न करता सरकारचा लॉकडाऊनचा निर्णय, सोनिया गांधींची टीका

सोनिया गांधी

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या तयारीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी हल्लाबोल केला आहे. २१ दिवसांचा लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय हा घाईने आणि तयारी न करता घेतला गेला, अशी टीका त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सोनिया गांधींनी या निर्णयाला पाठिंबा दिला होता. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर टीका केली. सोनिया गांधी यांच्याशिवाय राहुल गांधी यांनीही लॉकडाऊनवर प्रश्न उपस्थित केला. तसेच प्रवासी कामगारांच्या अडचणींचा उल्लेख केला. 

लॉकडाऊनमुळे मोटार आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत वाढ

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी म्हणाल्या की, लॉकडाऊन गरजेचे असू शकते. पण त्याच्या अनियोजित अंमलबजावणीमुळे लाखो प्रवासी कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी निपटण्यासाठी सरकारला एक विस्तृत रणनीति तयार करायला हवी होती. भारतासमोर कोरोना विषाणूच्या रुपात मोठी समस्या उभी राहिली आहे. परंतु, तिचा पराभव करण्यासाठी आपली इच्छा शक्ती मोठी असली पाहिजे. 

निजामुद्दीनमध्ये जे घडलं ते इथे घडू देऊ नका, शरद पवार यांची विनंती

त्या पुढे म्हणाल्या की, ही बैठक आरोग्याच्या आणि मानवावरील मोठ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. या युद्धात लाढत असलेले डॉक्टर, नर्स आणि उर्वरित वैद्यकीय पथकाला सरकारने संपूर्ण पाठिंबा द्यायला हवा. त्यांना सूट, एन ९५ मास्कसारख्या वस्तूंचा त्वरीत पुरवठा करायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

शिंकेतून ८ मीटरपर्यंत पसरु शकतो कोरोना विषाणू, संशोधकांचा दावा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sonia gandhi slams modi government on execution of lockdown in between coronavirus covid 19 in congress cwc meeting