पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष

सोनिया गांधी आणि शरद पवार

महाराष्ट्रात शिवसेनेशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये विचारविनिमय सुरू असला, तरी याला मूर्त रूप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रविवारी होणाऱ्या भेटीत मिळणार आहे. शरद पवार रविवारी दिल्लीत असून, ते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर महाराष्ट्रात शिवसेनेसोबत कशा पद्धतीने सरकार स्थापन करायचे. त्यामध्ये काँग्रेसची नक्की भूमिका काय असणार हे निश्चित होईल.

'महाराष्ट्राचे मालक आहोत ही अवस्था १०५ वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक'

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आतापर्यंत कायम आम्ही एकत्रित निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे कोणताही निर्णय आम्ही एकएकटे घेऊ शकणार नसल्याचे सांगत आहेत. याचाच पुनरुच्चार काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी केला. काँग्रेस एकटा काहीही ठरवू शकत नाही. शरद पवार आणि सोनिया गांधी हे दोन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि पुढील निर्णय घेतला जाईल. सत्ता स्थापन करण्यात ज्या संभाव्य अडचणी आहेत. त्या कशा पद्धतीने सोडवायच्या यावरही या बैठकीत चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे नेते सध्या पुढील सरकारसाठी किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याचे काम करीत आहेत. यासाठी या तिन्ही पक्षांचे नेते गेल्या काही दिवसांत एकमेकांना भेटले असून, त्यांच्यामध्ये या कार्यक्रमावर सहमती झाली असून, त्याचा मसुदा आता तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे अंतिम निर्णयासाठी पाठविण्यात आला आहे. 

महात्मा गांधींचा मृत्यू अपघाती; ओडिशामध्ये राजकारण तापले

मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता तिन्ही पक्ष भाजपला बाजूला ठेवून सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र येत आहेत. हे सरकार नक्की कसे असेल, सत्तापदांचे वाटप कसे केले जाईल, सरकारचा किमान समान कार्यक्रम नक्की काय असेल, हे लवकरच निश्चित होणार आहे.