पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात अन्याय, असहिष्णुता, भेदभावाला थारा नाही : सोनिया गांधी

सोनिया गांधी

काँग्रेसच्या कार्यवाहू अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. अन्याय, असहिष्णूता आणि भेदभाव करणाऱ्यांविरुद्ध आपण सर्वांनी मिळून लढा द्यायला हवा, असेही त्या जनतेला उद्धेशून म्हणाल्या. 
सोनिया गांधी यांनी दिल्लीतील २४ अकबरस्थित काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी त्या म्हणाल्या की, भारत सर्व क्षेत्रात प्रगती पथावर आहे. देशाच्या विकासात सत्य, अहिंसा आणि करुणा या सिद्धांताचा मोठा वाटा आहे.

 त्या पुढे म्हणाल्या, भारत देशात कट्टरता, अंधविश्वास आणि  सांप्रदायिकवाद, नक्षलवाद, असहिष्णुता आणि अन्यायासारख्या गोष्टींना स्थान नाही. आपण सर्वांनी मिळून अन्याय, असहिष्णुता आणि भेदभाव याच्याविरोधात सर्व देशवासियांनी मिळून थोपवायला हवे. स्वांतत्र्य, बंधुभाव, शांती आणि समानता ही मुल्ये जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  देशासाठी बलिदान देणार्या वीर जवानांबद्दल त्या म्हणाल्या की, देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांचे बलिदान कधीही विसरता कामा नये. शेतकरी, कलाकार आणि विचारवंत यांचे योगदानही महत्त्वपूर्ण असल्याचे सोनिया गांधींनी यावेळी म्हटले आहे.