पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरकार जनतेचा आवाज दाबत आहे; सोनिया गांधींचा आरोप

सोनिया गांधी

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशभरामध्ये ठिकठिकाणी हिंसक आंदोलन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी या प्रकरणात स्वत: हस्तक्षेप करावा आणि नागरिकत्व सुधारणा कायदा मागे घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी केली.

'विद्यार्थी आंदोलनामागे काँग्रेससह शहरी नक्षलवाद्यांचा हात'

राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी सांगितले की, 'सरकार जनतेचा आवाज दाबत आहे. जामिया विद्यापीठामध्ये घुसून विद्यार्थ्यांवर कारवाई करणे गंभीर आहे. सरकार संविधानाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसंच, सोनिया गांधींनी पुढे असे सांगितले की, दिल्ली आणि ईशान्य भारतातील परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींना याप्रकरणाची दखल घेण्यास सांगितले. आंदोलन करणे हा प्रत्येकाचा लोकशाही अधिकार आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

...म्हणून बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणेंनी साधला PM मोदींवर

सोनिया गांधी यांच्यासह काँग्रसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल, पी. चिदंबरम, टीआर बालू, सपा नेता रामगोपाल यादव यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना नागरिकत्व कायदाच्या विरोधात देशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाची माहिती दिली. या कायद्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असल्याचे समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी सांगितले.

CAB : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण