पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मोदी सरकार हिंसा आणि विभाजनाची जननी'

सोनिया गांधी

नागरिकत्व कायद्याविरोधात ईशान्य भारतात सुरु असेलेले आंदोलन आणि दिल्लीतील हिंसाचारावरुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी सरकार स्वतः हिंसा आणि विभाजनाची जननी झाली आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. मोदी सरकारने देशाला द्वेषाच्या अंधकारात ढकलून दिले आहे. तसेच तरुणांचे भवितव्य तापलेल्या भट्टीमध्ये सोडले आहे, असे आरोप सोनिया गांधींनी केले आहेत.

'अयोध्येत चार महिन्यात गगनचुंबी राम मंदिर उभारणार'

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ईशान्य भारत पेटला आहे. अनेक ठिकाणी या कायद्याविरोधात हिंसाचार उफाळून आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ईशान्य भारताचा दौरा करण्याची हिंमत नाही, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. सरकारचे काम शांतता आणि सलोखा निर्माण करणे, कायद्याचे आणि संविधानाचे रक्षण करणे हे आहे. मात्र, भाजप सरकारने देश आणि देशवासीयांवर हल्ला केला आहे, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे. 

इंडिया गेटसमोर प्रियांका गांधींचे ठिय्या आंदोलन

सरकारचा हेतू स्पष्ट आहे. देशात अस्थिरता पसरवणे, देशात हिंसाचार करणे, देशातील तरूणांचा हक्क काढून घेणे, देशात धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण करणे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी पुढे अशा म्हणाल्या की, सरकारमध्ये बसलेले राज्यकर्ते जेव्हा हिंसाचार करतात, संविधानावर हल्ला करतात, देशातील तरूणांना निर्दयपणे मारहाण करतात, मग देश कसा चालेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

शरद पवारांना भारतरत्न द्या; राष्ट्रवादीकडून स्वाक्षरी मोहीम