पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रात मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला: सोनिया गांधी

सोनिया गांधी

महाराष्ट्रातील सत्तासमीकरणावरुन काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी-शहांचा डाव अपयशी ठरला, असल्याची टीका त्यांनी केली आहे. भाजपकडून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केले गेला. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सांगण्यावरुन काम केले. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीला अपयशी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले गेले. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे मोदी-शहा सरकारचा डाव पूर्णत: अपयशी ठरला असल्याचे त्यांनी सांगितले.

'आजचा सूर्योदय एक नवा इतिहास रचतोय'

सोनिया गांधींनी सांगितले की, 'महाराष्ट्रात भाजपने केलेले कृत्य लज्जास्पद आहे. भाजपच्या प्रयत्नांना अयशस्वी करण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. विशेष म्हणजे आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे काही मंत्री देखील शपथ घेणार आहेत. राज्यामद्ये तीन पक्ष मिळून नवे सरकार स्थापन करत आहे.' दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला जाण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही, असे सोनिया गांधींनी सांगितले.

'कितीही चौकशा करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही'