काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी माहिती अधिकार कायदा सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर टीका केली. बहुमताचा सरकारकडून चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी एक निवेदन जारी करून सरकारवर टीका केली.
... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी
प्रदीर्घ चर्चेनंतर तयार करण्यात आलेला माहिती अधिकार कायदा २००५ कमकुवत करण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. व्यापक विचार करून आणि संसदेत दीर्घ चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात आले आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले होते. पण आता हा कायदा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
केंद्रातील सध्याचे नरेंद्र मोदी सरकार माहिती अधिकार कायद्याकडे अडसर म्हणून पाहते. केंद्रीय माहिती आयोगाचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय दक्षता आयोगासोबत केंद्रीय माहिती आयोगाला स्वतंत्र ठेवण्यात आले होते. पण आता याचे स्वातंत्र्य नष्ट करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार
माहिती अधिकार सुधारणा विधेयकामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांच्यासाठी अटी व शर्थी ठरविण्याचे त्याचबरोबर त्यांचे वेतन, भत्ते ठरविण्याचा अधिकार सरकारकडे देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. लोकसभेमध्ये हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे.