पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी

सोनिया गांधी

काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांनी निवड करण्यात आली आहे. अर्थात त्यांच्याकडे हे पद अंतरिम स्वरुपात देण्यात आले आहे. पक्षाचा पुढील अध्यक्ष निश्चित होत नाही. तोपर्यंत सोनिया गांधीच अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर शनिवारी रात्री उशीरा ही माहिती दिली.

समुद्रमार्गे दहशतवादी हल्ल्याची शक्यता, नौदल अलर्ट

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक शनिवारी रात्री ११ वाजता संपली. त्यानंतर गुलामनबी आझाद यांनी सोनिया गांधीच सध्या पक्षाच्या अध्यक्षपदी राहतील, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी राजीनामा दिला होता. तो अखेर कार्यकारिणीने मंजूर केला आहे.

सोनिया गांधी या सध्या युपीएच्या अध्यक्ष आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले होते. त्यानंतर राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. रणदीप सुर्जेवाला म्हणाले, काँग्रेस कार्यकारिणीने आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांना त्यांचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. पण त्यांनी नम्रपणे ती फेटाळली. त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने सोनिया गांधी यांना पुढील अध्यक्ष निवडेपर्यंत हे पद सांभाळावे, अशी विनंती केली. त्यांनी ती स्वीकारली. 

कलम ३७०: नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

पुढील अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधी यांच्याकडे हे पद दिले जावे, असा प्रस्ताव पी. चिदंबरम यांनी मांडला. काँग्रेस कार्यकारिणीने तो एकमताने मंजूर केला.