पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसची तयारी सुरु, सोनियांनी निकालादिवशीच बोलावली विरोधकांची बैठक

सोनिया गांधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येताच नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. निकालानंतर आपलाच पक्ष सर्वांत मोठा असेल अशी काँग्रेसला आशा आहे. या मोहिमे अंतर्गतच यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २३ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. 

'मोदींनी राजीव गांधींवर केलेल्या आरोपात तथ्य नाही'

निवडणुकीच्या निकालापूर्वी बैठक होऊन त्यात रणनिती निश्चित केली जावी यासाठी तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे प्रयत्नरत होते. पण ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि मायावती हे निकालानंतरच बैठक घेण्यासाठी आग्रही होते. यावेळी कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशाप्रसंगी कोणतीही संधी दवडली जाऊ नये या प्रयत्नात काँग्रेस आहे.

यासाठी काँग्रेसने आपले मुख्य सहकारी पक्ष द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पत्रही पाठवले आहे. जर एनडीएला बहुमत मिळवण्यात अपयश आले तर सरकार स्थापन करण्यासाठी तात्कालिक रणनिती तयार करावी, असे काँग्रेसने सहकारी पक्षांना म्हटले आहे. 

... यामुळे प्रियांका गांधींचा मुलगा रेहानने केले नाही मतदान

शरद पवार आणि एम के स्टॅलिन यांनी बैठकीला उपस्थितीत राहणार असल्याचे निश्चित केले आहे. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सोनिया गांधी सक्रिय नव्हत्या. पण निकालाची तारीख जवळ आल्यानंतर त्या विरोधी पक्षांची आघाडी करण्यास सक्रिय झाल्या आहेत. गतवर्षी आघाडी झाली होती. पण नंतर त्यात फूट पडली होती.