पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना: वडिलांचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, तहसिलदाराने केले अंत्यसंस्कार

मृतदेहावर अंत्यसंस्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

देशावर सध्या कोरोनाचे संकट आहे याच दरम्यान माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या मध्य प्रदेशमधील एका तहसिलदाराचे कौतुक होत आहे. मध्य प्रदेशमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या मुलाने वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर माणुसकी दाखवत तहसिलदाराने या रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत पुढचे पाऊल, इंग्लंडमध्ये मानवी चाचणी

भोपाळच्या चिरायू रुग्णालयात उपचारा दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णाचा २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलाने त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे भितीपोटी त्याने मृतदेह घेतला नाही. स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पीपीई किट सुद्धा दिली होती. तरी सुद्धा त्याने वडिलांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. 

हा फक्त फ्ल्यू नाही, अमेरिकेवर हल्ला झालाय - डोनाल्ड ट्रम्प

प्रशासनाने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. मृत व्यक्तीच्या पत्नीने आणि मुलाने प्रशासनाना एका पत्राद्वारे मृतदेह स्वीकारणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर तहसिलदाराने स्वत: उपस्थित राहत दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 

मुस्लिम डिलिव्हरी बॉयकडून किराणा घेण्यास नकार देणाऱ्याला अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:son refused to take dead body of father who died due to covid 19 tehsildar performed last rites