पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काही विचारवंत सापासारखे विषारी - उमा भारती

उमा भारती

देशात काही विचारवंत हे दुर्मिळ सापांसारखे आहेत. या सापांची संख्या कमी असते पण ते अत्यंत विषारी असतात. याच विचारवंतांकडून समाजातील वातावरण विषारी करण्याचे काम सुरू आहे. यावर आम्हाला काही उपाय करावे लागणार आहेत आणि येत्या काळात आम्ही ते नक्की करू, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी म्हटले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उमा भारती यांनी हे वक्तव्य केले.

लग्नाला नकार दिला म्हणून त्याने तिचा खून केला आणि नंतर...

जेएनयूमध्ये गेल्या रविवारी काही तरूण तोंडाला फडके बांधून घुसले. त्यांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून काही विद्यार्थ्यांना मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष जखमी झाल्या. ३० विद्यार्थी या मारहाणीत जखमी झाले. यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. दिल्ली पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे. 

पंढरपुरात मठाधिपतींच्या हत्येनंतर तपासात धक्कादायक माहिती उघड

दिल्लीमध्ये जेएनयूत झालेल्या हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध करण्यात येतो आहे. मुंबईतही आधी गेट वे ऑफ इंडिया आणि नंतर आझाद मैदान परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना आपला पाठिंबा दिला होता.