पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सपा-बसपाला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता, आणखी काही खासदार भाजपच्या वाटेवर

अखिलेश यादव आणि मायावती

माजी पंतप्रधान दिवंगत चंद्रशेखर यांचा मुलगा नीरज शेखर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे राज्यसभेतील आणखी काही खासदार येत्या काळात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांचे काही खासदार भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. जर भाजपमध्ये त्यांना योग्य स्थान मिळाल्यास ते राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश करू शकतात. 'लाईव्ह हिंदुस्थान'ने दिलेल्या वृत्तानुसार यापैकी एक खासदार बुंदेलखंड भागातील तर आणखी एक खासदार मध्य उत्तर प्रदेशातील आहे.

माझी सुरक्षा कमी करावी, प्रियांका गांधींचे CM आदित्यनाथ यांना पत्र

काही दिवसांपूर्वीच नीरज शेखर यांनी समाजवादी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अन्य काही खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा वेगाने सुरू झाली. अमर सिह हे समाजवादी पक्षाकडून राज्यसभेतील सदस्य झाले होते. पण त्यांनी आता समाजवादी पक्ष सोडला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करून आपल्या प्रवासाची दिशा काही अंशी जाहीर केली होती.

गुजरातमध्ये अल्पेश ठाकोर, धवलसिंह झाला यांचा भाजपत प्रवेश

बहुजन समाज पक्षाचेही दोन खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडूनही राजीनामे दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यसभेतील आणखी दोन जागा रिक्त होतील. राज्यसभेत बहुमत प्राप्त करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यासाठीच ही रणनिती आखली जात आहे. उत्तर प्रदेशातून येणाऱ्या राज्यसभेतील जागांसाठी पोटनिवडणूक झाली तर त्या ठिकाणी भाजपलाच फायदा होणार आहे. त्याचबरोबर सर्व पोटनिवडणूक एकदम न घेता वेगवेगळ्या वेळी घेतल्यास पक्षाला जास्त फायदा होईल. त्यामुळे या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:some rajya sabha mp from sp and bsp may join bjp soon in uttar pradesh and madhya pradesh