पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाउन : हॉटस्पॉट नसणाऱ्या ठिकाणी सूट मिळेल, पण....

डॉक्टांना रेनकोट्स, सनग्लासेस आणि साधे कापडी मास्क देण्यात आले आहेत.

कोरोनाचे संकटावर मात करण्यासाठी देशात लॉकडाउन कायम असताना हॉटस्पॉट नसणाऱ्या ठिकाणी काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि गृहमंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती देण्यात आली. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील १७० जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हे जिल्हे वगळता ग्रामीण विकासाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मनरेगा,  कृषीविषयक आणि छोट्या उद्योगांना परवानगी देण्याचे आदेश काढले आहेत. 

देशातील १७० जिल्ह्यांवर हॉटस्पॉटचे संकट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

लॉकडाउनमध्ये ज्या भागात काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्येक कामगाराने मास्क वापरावे तसेच सोशल डिस्टन्सिंग नियमाचा पालन करणे अनिवार्य असेल, अशी सक्ती करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिवांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  मनरेगासह जलसिंचनाशी संबंधित कामाला विशेष प्राधान्य देण्यात याव्या अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर, ११७ रुग्णांमध्ये भर

ग्रामीण भागात असणारे उद्योगामध्ये प्रामुख्याने अन्न प्रक्रिया, रस्ते निर्मिती, सिंचन प्रकल्प यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील उद्योग, माहिती-तंत्रज्ञान या क्षेत्रातील कंपन्या यांचेही काम आवश्यकतेप्रमाणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आर्थिक संकट थोड्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:some private sector industries and other Worker permitted by govt issues lock down guidelines