पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी 'लॉक डाउन'ची घोषणा करणार ही फक्त अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोनाविषयी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी संचार बंदी सारखा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी असा अंदाज वर्तवला आहे. एवढेच  नाही तर काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदींनी हे पाऊल उचलण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले आहे. पण प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी असा कोणताही निर्णय पंतप्रधान मोदी मोदी घेणार नसल्याचे म्हटले आहे. 

PM मोदींच्या भाषणासंदर्भात चिदंबरम यांची 'मन की बात'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवीर मोदी संचारबंदीची मोठी घोषणा करणार आहेत, ही अफवा अशल्याचे शशी शेखर यांनी म्हटले आहे. सध्या देशात चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थिती अशा प्रकारच्या वृत्तातून देशात दहशतीचे वातावरण निर्माण करु नये, असेही त्यांनी म्हटले आहे.पंतप्रधान मोदी आज (गुरुवारी) रात्री ८ वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मोदी आपल्या भाषणातून 'लॉक डाउन'चा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा रगंली होती.  

भारतात अद्याप कोरोनाचा समूह संसर्ग नाही, ICMR ची माहिती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Some media outlets are speculating that PM Modi will announce a lock down in his address goverment said This information is incorrect