पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एआयएडीएमके पक्षाचे होर्डिंग अंगावर पडून तरुणीचा मृत्यू

चेन्नईमध्ये तरुणीचा मृत्यू

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये होर्डिंगने एका २३ वर्षीय तरुणीचा बळी घेतला आहे. ही तरुणी सॉफ्टवेयर कंपनीमध्ये कामाला होती. गुरुवारी ऑफिसवरुन घरी जात असताना या तरुणीच्या अंगावर एआयएडीएमके पक्षाचे अनधिकृत रित्या लावलेले होर्डिंग पडले. त्यानंतर एका टँकरने तिला चिरडले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सलग ४ दिवस बँक राहणार बंद; महत्वाची कामं आताच करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबाश्री कांथाचेवदी असे या तरुणीचे नाव आहे. ती चेन्नईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होती. सुबाश्री सकाळी सहा वाजता ऑफिसला गेली होती. दुपारी दोन वाजता शिफ्ट संपल्यानंतर ती दुचाकीवरुन घरी जात होती. पल्लवराम थोरइपक्कम रेडियल रोडवर सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेचे होर्डिंग लावले होते. अनधिकृतरित्या लावलेले हे होर्डिंग सुबाश्रीच्या अंगावर पडले. त्यानंतर सुबाश्री दुचाकीवरुन खाली पडली. पाठीमागून येणाऱ्या पाण्याच्या टँकरने तिला चिरडले. या दुर्घटनेत सुबाश्रीचा मृत्यू झाला. 

भास्कर जाधव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

चेन्नई पोलिसांनी सांगितले की, हे होर्डिंग अनधिकृत होते. ज्यांनी हे होर्डिंग लावले आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई करत आहोत. तर टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे. ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये हे होर्डिंग छापण्यात आले होते. त्या प्रिंटिंग प्रेसला सील करण्यात आले आहे. या घटनेमुळे चेन्नईमध्ये खळबळ उडाली आहे. 

मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन