पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराणच्या प्रसिद्ध इन्स्टाग्राम सेलिब्रिटीला अटक

सहार तबर

इराणमधल्या प्रसिद्ध इन्स्टाग्राम स्टारला  अटक करण्यात आल्याची माहिती तस्निम या वृत्तसंस्थेनं दिली आहे. सहार तबर ही वर्षभरापूर्वी अँजेलिना जोलीसारख्या मेकअपमुळे चर्चेत आली होती. 

मुंबईत भिकाऱ्यांची संपत्ती बघून पोलिसही चक्रावले, बँकेत ८ लाखांच्या FD

अँजेलिना जोलीच्या मॅलेफिसन्ट या पत्राप्रमाणे तिनं मेकअप केला होता. मात्र 'अँजेलिना जोली बनण्याच्या नादात तिचा चेहरा  विद्रुप झाला' अशा मथळ्याखाली अनेक बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या होता. मात्र हा केवळ मेकअप आणि फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरचा प्रकार असल्याचं तिनं स्पष्ट केलं. तिचे मेकअपमधले विविध प्रयोग चाहत्यांनाही आवडतात. 

आरेमधील वृक्षतोडीला सुप्रीम कोर्टाची तूर्त स्थगिती

तिचा मोठा फोलोअर्स सोशल मीडियावर आहे. मात्र तिला  संस्कृती आणि धर्म बुडवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तिच्यावर ईश्वरनिंदा, हिंसा,  अधर्माच्या मार्गानं पैसे कमावण्याचा आणि युवा पिढीला भष्ट्राचारासाठी प्रेरित करण्याचा  आरोप लावण्यात आला आहे. 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:social media star known as Sahar Tabar was detained on the orders of Tehrans guidance court