पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीमध्ये चोरट्यांनी महिला पत्रकारावर केला हल्ला

दिल्ली पोलिस

दिल्लीमध्ये एका महिला पत्रकारावर चोरट्यांनी हल्ला केला आहे. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश परिसरात रविवारी संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली आहे. जॉयमाला असं या महिला पत्रकाराचे नाव आहे. रविवारी त्या खरेदी करुन घरी परतत असताना चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी सीआर पार्क पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दोन्ही देशांची तयारी असेल तर काश्मीर प्रश्नी मध्यस्थीसाठी तयार 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पत्रकार जॉयमाला या पश्चिम बंगालच्या राहणाऱ्या आहेत. दिल्लीतील सीआर पार्कमध्ये त्या कुटुंबियांसोबत राहतात. रविवारी सुट्टी असल्याने त्या चितरंजन पार्क येथे खरेदीसाठी आल्या होत्या. खरेदी करुन झाल्यानंतर त्या रिक्षामध्ये बसत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातला मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. जॉयमाला यांनी विरोध केला असता चोरट्यांनी रिक्षातून त्यांना खाली ओढले आणि त्यांच्या हातातील मोबाईल घेऊन फरार झाले. झटापटीत जॉयमाला या गंभीर जखमी झाल्या. 

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज युतीची घोषणा करणार ?

घटनेची माहिती मिळताच सीआर पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या जॉयमाला यांना एम्स रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेमुळे दिल्लीमध्ये महिला पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

चर्चेची वेळ संपली आता काम करण्याची गरजः मोदी