इन्स्टाग्रामवर स्वतःच्या मुलीसोबतचा सेल्फी केद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी अपडेट केला होता. पण या फोटोवरून त्यांच्या मुलीला तिच्या शाळेतील वर्गमित्रांनी चिडवण्यास आणि सेल्फीतील तिच्या लूकची नक्कल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मुलीने सांगितल्यामुळे सुरुवातीला स्मृती इराणी यांनी हा सेल्फी इन्स्टाग्रामवरून काढून टाकला. पण नंतर त्यांनी एक पोस्ट लिहून मुलीची चेष्टा करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिले आहे.
वैद्यकीय प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला आणखी ९७० जागा
स्मृती इराणी यांनी लिहिले आहे की, मुलीसोबतच्या फोटोची पोस्ट मी डिलिट केली होती. कारण तिच्या वर्गातील एका मुलाने या फोटोवरून तिची चेष्टा आणि नक्कल करायला सुरुवात केली. वर्गात हे सगळं घडल्यावर मुलीनेच मला तो फोटो इन्स्टावरून काढून टाकायला सांगितले. मुलीच्या त्या मागणीमुळे मी तो फोटो डिलिट केला. पण नंतर माझ्या असे लक्षात आले की असे करणे हे त्या चेष्टा करणाऱ्याच्या पथ्यावरच पडल्यासारखे आहे.
मुलीसोबतचा फोटो डिलिट केल्यामुळे इन्स्टापोस्टवरून एखाद्याची चेष्टा करणाऱ्याला आणखी बळ मिळाल्यासारखेच होईल. फोटो डिलिट करण्याचे माझे काम त्याला बळ देणारेच ठरेल. हे लक्षात आल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करून तिच्या आतापर्यंतच्या यशाची माहिती सविस्तरपणे लिहिली आहे.
एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशास चीनचा अडथळा
माझी मुलगी एक चांगली क्रीडापटू आहे. लिम्का बूकमध्ये तिच्या कामगिरीची नोंद झाली आहे. ती कराटेमध्ये ब्लॅक बेल्टधारक आहे. जागतिक स्पर्धेत तिला ब्राँझ पदक मिळाले आहे. ती खरंच खूप प्रेमळ आणि सुंदर आहे, अशा आशयाची इन्स्टापोस्ट स्मृती इराणी यांनी लिहिली आहे.
तुम्ही कितीही तिची चेष्टा करा. ती निर्भयपणे त्याचा प्रतिकार करेल आणि पुढे जाईल. तिची आई असण्याचा मला अभिमान आहे, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.