दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोण तिथे गेल्याच्या घटनेवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दीपिका पदुकोण काँग्रेसला पाठिंबा देते हे २०११ मध्येच स्पष्ट झाले होते. तिने पंतप्रधानपदासाठी त्यावेळीच राहुल गांधी यांना पाठिंबा दिला होता. २०११ मधील दीपिकाच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ काही जणांकडून व्हायरल करण्यात आला आहे. याच व्हिडिओचा संदर्भ घेऊन स्मृती इराणी यांनी ही टीका केली.
सायरस मिस्त्री यांच्या फेरनियुक्तीच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगित
स्मृती इराणी म्हणाल्या, मला असं वाटतं की जो कोणी वृत्तपत्र वाचतो आहे. त्याला माहितीये की आपण नक्की कुठे जातो आहोत. त्याला माहितीये की प्रत्येकवेळी सीआरपीएफचा जवान शहीद होतो, त्यावेळी कोण आनंदोत्सव साजरा करतो. दीपिका कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देते हे मला आधीपासूनच माहिती होते. आपल्याकडे बघत नसलेल्या मुलीला मारणाऱ्या लोकांसोबत उभे राहण्याचा तिचा अधिकार मी नाकारू शकत नाही. २०११ मध्येच ती काँग्रेसला पाठिंबा देते हे स्पष्ट झाले होते. भारत तेरे तुकडे होंगे असे म्हणणाऱ्या लोकांच्या शेजारी उभे राहण्याचा तिला अधिकार आहे, असाही टोमणा स्मृती इराणी यांनी यावेळी मारला.
गडचांदूर नगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता
जेएनयूतील विद्यार्थ्यांवर गेल्या रविवारी झालेल्या हल्ल्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी दीपिका पदुकोण गेली होती. तिच्या या कृतीमुळे अनेकांनी दीपिकावर टीका केली. तर अनेकांनी तिच्या कृतीचे समर्थन केले होते.