पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती इराणी... इन्स्टाग्राम पोस्ट... आणि लक्षवेधक कॅप्शन

स्मृती इराणी आणि बिल गेट्स

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी आपल्या हटके सोशल मीडिया पोस्टमुळे इतरांचे लक्ष वेधून घेण्यात कायम यशस्वी ठरतात. विशेषतः सोशल मीडियासाठीच्या पोस्टसोबत त्यांनी दिलेल्या शब्दओळी लक्षवेधी असतात. स्मृती इराणी यांनी सोमवारी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला असाच एक फोटो आणि त्यासोबत दिलेली ओळ नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय झाली आहे.

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने स्मृती इराणी यांची सोमवारी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची नवी दिल्लीमध्ये भेट झाली. या भेटीतील एक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या बिल गेट्स यांच्याशी बोलत त्या स्वयंचलित जिन्यावरून वर येताना दिसताहेत. याच फोटोसोबत त्यांनी एक ओळ दिली आहे. 'सोच रहे हैं पढ़ाई पूरी करी नहीं, आगे क्या करें' अशी ती ओळ आहे.

बिल गेट्स यांनी वयाच्या २० व्या वर्षी आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडले होते. जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीची पायाभरणी करण्यासाठीच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. तरीही त्याचा त्यांच्या व्यावसायिक यशावर काहीही परिणाम झाला नाही.

गांधी कुटुंबियांची SPG सुरक्षा काढण्यावरून काँग्रेस आक्रमक

दुसरीकडे स्मृती इराणी यांनीही आपले महाविद्यालयीन शिक्षण अर्धवटच सोडले होते. पण तरीही त्यांनी ज्या क्षेत्रात काम केले तिथे त्या यशस्वी झाल्या. आधी अभिनेत्री म्हणून आणि नंतर राजकारणी म्हणून त्यांनी यश संपादन केले. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये काँग्रेसचे तत्कालिन अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता. निवडणुकीवेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपण पदवीधर नसल्याचे सांगितले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सोच रहे हैं पढ़ाई पूरी करी नहीं , आगे क्या करें 🧐

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on