पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजलीसाठी स्मृती इराणी यांचे भावूक ट्विट

स्मृती इराणी

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे अनेक राजकीय नेते भावूक झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी महिलांच्या प्रगतीसाठी आयुष्य समर्पित करणे हीच सुषमा स्वराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे म्हटले आहे. आपल्या ट्विटसोबत स्मृती इराणी यांनी सुषमा स्वराज यांचा तरुणपणातील एक फोटोही शेअर केला आहे.

पूरग्रस्तांना तातडीची मदत करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अनेक महिला कार्यकर्त्याच्या प्रेरणास्रोत असलेल्या सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनामुळे आम्ही स्तब्ध झालो आहोत. त्यांच्या शोकाकुल कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त करते. एक कार्यकर्ता म्हणून महिलांच्या प्रगतीसाठी जर आपण आपले आयुष्य समर्पित केले तर ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर अडवाणींच्या डोळ्यात पाणी

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या. त्या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री होत्या. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही सुषमा स्वराज मंत्री राहिल्या होत्या. मंगळवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे एम्स रुग्णालयात निधन झाले.