पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'काँग्रेस खासदाराकडून भाजप महिला सदस्यांसोबत गैरवर्तन'

स्मृती इराणी

लोकसभेतील काँग्रेस सदस्यांनी सभागृहात भाजपच्या महिला सदस्यांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. हा मुद्दा लोकसभा अध्यक्षासमोर उचलून धणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी लोकसभेच्या सत्रात दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मुद्यावरुन सत्ताधारी भाजपचे सदस्य आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला.  

सोशल मीडिया सोडण्यापेक्षा द्वेष सोडा : राहुल गांधींचा मोदींना टोला

तीनवेळा खासदार राहिलेल्या जसकौर मीणा यांना सभागृहात धक्का देण्यात आला. काँग्रेस सदस्य राम्या हरिदास यांनी भाजपच्या एका दलित सदस्यासोबतही गैरवर्तन केल्याचा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. संसद भवन परिसरात स्मती इराणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा सभागृहामध्ये भाजपच्या महिलांसोबत गैरवर्तन केले. त्यांच्या विरोधात (काँग्रेस खासदार) अध्यक्षांनी कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील दोन ते तीन सत्रापासून काँग्रेस संसदेत गुंडागिरी दाखवत कामकाजामध्ये अडथळे निर्माण करत आहे. काँग्रेस सदस्यांचे हे वर्तन गांधी कुटुंबीयांची हताशा दर्शवणारे असल्याचा टोमणाही त्यांनी लगावला.  

PM मोदी सोशल मीडियाला 'रामराम' करण्याच्या विचारात

यापूर्वी काँग्रेस खासदार राम्या हरिदास यांनी लोकसभेतील भाजपा सदस्या जसकौर मीणा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणात त्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली असून यासंदर्भात कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.