पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन केली हत्या, आरोपी अटकेत

सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन केली हत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

दक्षिण त्रिपुरामध्ये सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. आरोपी कछला त्रिपुराला (वय ३०) पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.

गुजरातमध्ये जे झालं, ते वारिस पठाण यांनी विसरु नयेः भाजप नेता

पोलिसांनी सांगितले की, गोमती जिल्ह्यातील घोरकप्पा गावात पीडित मुलगी आरोपीच्या मुलीसोबत अंगणात खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिला. 

स्वरा म्हणते, या सरकारवर भरवसाच नाय!

आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याने पीडित मुलीवर बलात्कार करुन तिचा गळा घोटला व नंतर तिचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

धक्कादायक! तळोजामध्ये एका घरात सापडले चौघांचे मृतदेह