पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा झाले दिल्लीचे मुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत आपच्या सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

VIDEO: जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा

अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, इम्रान हुसेन, गोपाल राय, राजेंद्र गौतम आणि कैलाश गहलोत या सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरविंद केजरीवाल यांनी २०१३ साली पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत.  

राज्य सरकारला सुध्दा स्वतंत्र चौकशीचा अधिकार: शरद पवार

दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यासाठी आपकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. अरविंद केजरीवालांनी शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकरी यांच्यासह ५० लोकांना आमंत्रित केले होते. दिल्लीला पुढे नेण्यासाठी प्रमुख भूमिका असलेल्या सफाई कामगार, मेट्रो चालक, शेतकरी यासह ५० जणांना आपकडून खास निमंत्रण देण्यात आले होत. हे सर्वजण केजरीवालांसोबत मंचावर बसले होते. 

'...तर भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करु'