पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लष्कर प्रमुखांचा पाकला पुन्हा एकदा इशारा

बिपीन रावत

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी बुधवारी एक मोठे वक्तव्य केले आहे. नियंत्रण रेषेवर (एलओसी) मोठ्या हालचाली होण्याचा अंदाज व्यक्त केला असून भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर मोठी कारवाई होऊ शकते, असे भाष्य त्यांनी केले आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून भारत-पाक यांच्यातील तणाव वाढला आहे. भारताच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करुन शेजारील राष्ट्र थांबलेले नाही. 

प्रियांका गांधी म्हणाल्या, BJP प्रचार करण्यात सुपर हिरो पण,...

पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात येत आहे. त्यांच्या कुरापती थांबण्याचे नाव दिसत नाही.केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी मागील महिन्यात लोकसेभेत दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टपासून ते ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानकडून ९५० वेळा शस्त्रसंधीच उल्लंघन करण्यात आले आहे.  

गोंदियात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर अ‍ॅसिड हल्ला

पाकिस्तानला इशारा देण्याची बिपीन रावत यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. भारताविरुद्ध कोणतेही कृत्य करण्याचा प्रयत्न करु नका, अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे तंबी बिपीन रावत यांनी पाकला यापूर्वीही दिली आहे.