पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाविरोधातील लढाईत या देशाने उचलले महत्त्वाचे पाऊल

सिंगापूरमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे कोरोनाविरोधातील लढाई

कोरोना विषाणूविरोधातील लढाईमध्ये सिंगापूरचे पंतप्रधान ली श्येन लूंग यांनी पुढेच पाऊल टाकले आहे. त्यांनी सिंगापूरमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. येत्या मंगळवारी, ७ एप्रिलपासून देशात एक महिन्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 

धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन

लॉकडाऊनच्या काळात सिंगापूरमधील जीवनावश्यक वस्तू वे सेवा सुरू राहतील. त्याचबरोबर देशाच्या आर्थिक आघाडीवरील कामही सुरळीत राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. या काळात सामान्य नागरिकांना रस्त्यावर येण्यास बंधने घालण्यात आली आहेत. जीवनावश्यक वगळता इतर सर्व उद्योग, व्यवसाय, कारखाने, कामाची ठिकाणी एक महिन्यासाठी बंद ठेवण्यात येतील. 

सिंगापूरने काही दिवसांपूर्वीच सोशल डिस्टन्सिंग (दोन व्यक्तींमधील सुमारे १ मीटरचे अंतर) न पाळणाऱ्यांना  सात हजार डॉलरचा दंड आणि सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा ठोठावण्यात येईल, असे जाहीर केले होते. सिंगापूरमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे कोरोनाविरोधातील लढाईसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंगापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. अर्थात त्यांचे प्रमाण परदेशातून सिंगापूरमध्ये आलेल्यांमध्ये जास्त आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सिंगापूरमधील सरकारने हा नवीन नियम केला आहे. 

'कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होईल असे सध्या तरी दिसत नाही'

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानंतर आता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. भारतानेही २५ मार्चलाच २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. युरोपमधील काही देशांमध्येही सध्या लॉकडाऊन सुरू आहे.