पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तेलगळतीमुळे सिंगापूरला निघालेले विमान नागपूरला वळविण्यात आले

इंडिगो

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंगापूरला निघालेले इंडिगोचे विमान तेलगळतीमुळे नागपूरला वळविण्यात आले. या घटनेची माहिती कळल्यावर काही वेळ विमानातील प्रवासी खूप घाबरले होते. पण सुखरुपपणे हे विमान नागपूर विमानतळावर उतरले.

कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला?, वाचा पूर्ण यादी

इंडिगोने अधिकृतपणे या घटनेला दुजोरा दिला आहे. या विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. हे विमान मुंबईहून सिंगापूरला निघाले होते. पण तांत्रिक कारणामुळे ते नागपूरला वळविण्यात आले. यानंतर नव्या विमानाची व्यवस्था करून नागपूरहून सर्व प्रवाशांना सिंगापूरला पाठविण्यात आले. पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यासाठी पाच तासांचा वेळ गेल्याबद्दल इंडिगोने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली.

आता सर्व मोफत वाहिन्यांसाठी महिन्याला द्यावे लागणार इतके रुपये

विमानात नक्की काय दोष होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण तेलगळतीच्या घटनेमुळे काही वेळ चिंतेचे वातावरण होते. पण वैमानिकाने अत्यंत सुरक्षितपणे हे विमान नागपूर विमानतळावर उतरविले.