काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांना कर्तारपूर कॉरिडॉर उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळाली आहे. यासंदर्भात त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे पत्राच्या माध्यमातून विनंती केली होती. त्यांच्या तिसऱ्या पत्रानंतर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे.
मला पाकिस्तानला जाऊ द्या, नवज्योतसिंग सिद्धूंची विनंती
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पहिल्या दोन पत्रानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी ७ नोव्हेंबरला पुन्हा ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी पाकिस्तानने निमंत्रण दिल्याचे सांगत याठिकाणी जाण्याची परवानगी मागितली होती. यासंदर्भात वारंवार आठवण लिखित स्वरुपात स्मरण करुन देखील मला परवानगी मिळाली आहे किंवा नाही हे समजू शकलेले नाही, असा उल्लेख त्यांनी आपल्या पत्रात केला होता.
नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा
कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे शीख बांधवांचे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यासाठी करारही करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सिद्धू यांना निमंत्रण देण्यात आले आहे.