पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रिपदाचे काम न करता नुसते वेतन घेणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धूंवर भाजपची टीका

नवज्योतसिंग सिद्धू

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी असलेल्या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून आपल्या दिलेल्या मंत्रालयाच्या कामकाजात सहभागी न झालेले माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. 'एकतर काम करा नाही तर खु्र्ची खाली करा', अशी मागणी भाजपकडून नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे करण्यात आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू मंत्रिपदामुळे मिळणारे सर्व भत्ते आणि वेतन घेत आहेत. पण ते मंत्रालयाच्या कामकाजात महिन्याभरापासून सहभागी झालेले नाहीत. त्यावरून भाजपने थेट राज्यपालांकडे तक्रार केली आहे.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादः त्वरीत सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

भाजपचे राष्ट्रीय चिटणीस तरूण चूघ यांनी 'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी पंजाबच्या राज्यपालांना पत्र लिहिले आहे. पंजाबमध्ये घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या ज्या नेत्याने मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते महिन्याभरापासून मंत्रालयात आलेले नाहीत. मंत्रालयाच्या कामकाजात त्यांनी सहभाग घेतलेला नाही. पण मंत्रिपदामुळे मिळणारे सर्व भत्ते आणि वेतन ते घेत आहेत, असे त्यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यातील वादामुळे घटनात्मक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता राज्यपालांनीच लोकहिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. जर संबंधित मंत्र्यांना त्यांना दिलेल्या मंत्रालयाचे काम करायचे नसेल, तर ती जबाबदारी दुसऱ्या कोणत्यातरी मंत्र्याकडे सोपवावी. जर ते नुसते वेतन घेत असतील आणि काम करीत नसतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जावी, असेही तरूण चूघ यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिले आहे.

आयएसआयचे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या WhatsAppवर लक्ष

गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडील स्थानिक संस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक कामकाज मंत्रालयांची जबाबदारी काढून घेतली होती.