पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. श्रीराम लागूंना वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान मोदींनी डॉ. श्रीराम लागूंना वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात मंगळवारी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर श्रीराम लागूंना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे काम कायम लक्षात राहील, त्यांच्या निधनानं दु:ख झालं असं म्हणत ट्विटरवर मोदींनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

अन् डॉक्टर 'नटसम्राट' होऊन 'सिंहासना'वर विराजमान झाले...

डॉ. श्रीराम लागू हे अष्टपैलू आणि सतेज व्यक्तीमत्त्व होतं. आपल्या दर्जेदार सादरीकरणानं त्यांनी गेली कित्येक वर्षे रसिकप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कामानं ते कायम लक्षात राहितील. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झाले, असं लिहित मोदींनी श्रद्धांजली वाहिली. 

'नटसम्राट', 'मित्र, 'जगन्नाथाचा रथ', 'सुंदर मी होणार', 'हिमालयाची सावली' सारखी दर्जेदार नाटकं, 'पिंजरा', 'सामना', 'सिंहासन' सारख्या चित्रपटांत लागूंनी काम केलं आहे. नाटक, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं डॉ. लागूंनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. 

'नटसम्राटा'ला सिने- नाट्यसृष्टीतून श्रद्धांजली

'मराठी रंगभूमीने लाडका नटसम्राट गमावला आहे. झाले बहु, होतील बहु; पण या सम हाच!', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील डॉ. श्रीराम  लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.