पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आप आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेले आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. तर एका कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. 

दिल्लीत 'आप'मतलब्यांचा पराभव; सामनातून भाजपवर निशाणा

नरेश यादव महरौली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नरेश यादव आपल्या कार्यकर्त्यांसोबत मंगळवारी रात्री मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. त्याठिकाणावरुन परत येत असताना एका व्यक्तीने त्यांच्या ताफ्यावर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये आपचे कार्यकर्ते अशोक मान यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एका कार्यकर्त्याला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

अरविंद केजरीवाल यांचा येत्या रविवारी शपथविधी, रामलीला मैदानावर सोहळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत्यू झालेला आपचा कार्यकर्ता अशोक मान यांच्यामध्ये पूर्वीचा वाद होता. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. २०१९ मध्ये आरोपीच्या पुतण्याला गोळी मारली होती. अशोक मान यांनीच गोळी झाडल्याचा संशय आरोपीला होता. तसंच आरोपीने अशोक मान यांना १५ दिवसांपूर्वी धमकी देखील दिली होती. गोळीबार करताना आरोपीच्या निशाण्यावर फक्त आपचे कार्यकर्ते अशोक मान होते. 

उमा भारतींकडून पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा गोळीबार रात्री साडे दहाच्या सुमारास झाला. आरोपीने ४ राऊंड फायर केले असल्याचे  नरेश यादव यांनी सांगितले. दरम्यान, नरेश यादव महरौली विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. नरेश यादव यांनी भाजपच्या कुसुम खत्री यांचा पराभव केला. त्यांना ६२ हजार ३०२ मतं पडली आहेत. 

Delhi Results: 'आप'ने गड राखला; भाजप एक अंकी तर काँग्रेसचा