पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वंदे भारत'ला अमित शहांकडून हिरवा झेंडा, वाचा या गाडीची खास वैशिष्ट्ये

वंदे भारत एक्स्प्रेस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नवी दिल्ली ते कटरा स्थानकांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. येत्या शनिवारपासून ही गाडी अधिकृतपणे या मार्गावर धावण्यास सुरुवात होईल. ट्रेन १८ म्हणूनही ही रेल्वेगाडी ओळखली जाते. विशेष म्हणजे या रेल्वेला वेगळे इंजिन जोडले जाणार नाही. 

वरळीत शिवसेनेकडून मोठे शक्तिप्रदर्शन, आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार

दिल्ली ते कटरा मार्गावर ही सेमी हायस्पीड रेल्वे सुरू झाल्यावर वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास आणखी सुखकर होणार असून, त्यांच्या प्रवासाच्या वेळेत चार तासांची बचतही होणार आहे. सध्या या प्रवासाला १२ तास लागतात. ते आता ८ तास लागणार आहेत. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला होता.

काय आहेत या गाडीची वैशिष्ट्ये
या रेल्वेमध्ये एकूण १६ वातानुकूलित डबे असणार आहेत. यामध्ये दोन डबे एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे असतील. तर १२ चेअर कारचे असतील. गाडीच्या दोन्ही बाजूला ड्रायव्हर कार म्हणजेच इंजिन असणार आहे.

या गाडीच्या डब्यांना वेगळे इंजिन असणार नाही. रचनेमध्येच इंजिनाचा समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी या गाडीमध्ये वेगळ्या स्वरुपाचे शौचालय असणार आहेत.

गाडीचे सर्व डबे एकमेकांना जोडलेले असणार आहेत. त्यामुळे गाडीतील प्रवासी सहजपणे एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाऊ शकतील.

गाडीतील खुर्च्या या ३६० अशांत वळणाऱ्या असणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक खुर्चीवर मोबाईल चार्जिंग पॉईंट असणार आहे. गाडीतील पाण्याचे नळ हँण्डस-फ्री असतील. त्याचबरोबर विमानातील शौचालयांसारखी शौचालये या गाडीत असतील.

... तर पाच कोटी लोक नाहक मारले जातील

गाडीच्या सर्व डब्यातील दरवाजे ऑटोमॅटिक असणार आहेत आणि त्याचे नियंत्रण चालकाकडे असणार आहे.

विशेष म्हणजे रेल्वे थांबविण्यासाठी असणारी चेन या गाडीमध्ये असणार नाही. जर कोणत्या प्रवाशाला काही अडचण असेल तर तो त्याच्या खुर्चीजवळील बटण दाबू शकतो. यानंतर गाडीतील सहायक त्याच्याकडे येऊन त्याची अडचण जाणून घेतील.