पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोपियात सुरक्षादलाबरोबरील चकमकीत ४ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरः दहशतवाद्यांबरोबर चकमक (ANI)

जम्मू-काश्मीरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुरक्षादलांनी दहशतवाद्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे. रविवारी (आज) पहाटे घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. सुरुवातीला दोन दहशतवाद्यांना सुरक्षादलांनी ठार केले होते. मृत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात वाढत्या घुसखोरीच्या घटनेमुळे सुरक्षादल सतर्क आहेत. सातत्याने शोध मोहीम राबवण्यात येत आहे. 

शोपियातील कीगम येथील दारमदोरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

उरी दहशतवादी हल्ला : सैन्यदलातील 'त्या' तीन कमांडरवर कारवाईचे संकेत

तत्पूर्वी, शनिवारी बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये बारियान येथेही सुरक्षादलांनी एका दहशतवाद्याला मारले होते. बारामुला जिल्ह्यातील या परिसरात दहशतवादी उपस्थितीत असल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरु केली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला होता.