जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा जवानांना माहिती मिळाली होती की शोपियां जिल्ह्यातील मेलहूरा गावामध्ये दहशतवादी लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत गावाला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी झालेल्या चकमकीत जवानांनी ४ दहशतवाद्यांना ठार केले.
#UPDATE 4 unidentified terrorists killed. Arms & ammunition recovered. Operation over: Kashmir Zone Police on Shopian encounter #JammuAndKashmir https://t.co/HTvyQMqAe0
— ANI (@ANI) April 22, 2020
'मजुरांसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा केंद्रानं विचार करावा'
जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले असता एका घरामध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केला. जवानांनी या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. तरी सुद्धा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरुच ठेवला. याच दरम्यान झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळावरुन जवानांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.
जिओमध्ये फेसबूकची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, ...हे आहे कारण
एकीकडे संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढा देत आहे. अशामध्ये पाकिस्तान समर्पित दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, मंगळवारीच शोपियांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना जवानांनी अटक केली होती. या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केला होता.