महाराष्ट्रानंतर भाजपने झारखंडही गमावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झारखंडसाठी लावलेली ताकद फुकट गेली, असल्याची टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून या राज्यामध्ये भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत: देवेंद्र फडणवीस
मोदी आणि शहा यांनी झारखंडसाठी पूर्ण ताकद लावली. नागरिकत्व कायद्याचा झारखंडला फायदा होईल असे त्यांनी सांगितले होते. मात्र झारखंडमधील जनतेने भाजपला नाकारले आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्तीचे सरकार येणार असल्याचे, संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, झारखंडचा निकाल अपेक्षित आहे. महाराष्ट्रनंतर झारखंडमध्ये देखील भाजपची सत्ता जाईल. भाजपला आत्मचिंतनाची गरज असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Jharkhand: धक्कादायक!, मुख्यमंत्री रघुवर दास पिछाडीवर
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. झारखंडमध्ये भाजपची सत्ता होती. मात्र मतमोजणीचे ट्रेंड्स पाहता भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. ८१ जागांपैकी भाजप फक्त २८ जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी सर्वाधिक जागांवर पुढे आहे.