पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भीतीलाही उत्सवाचं रुप दिल्यानंतर असंच होणार, संजय राऊत यांचा मोदींना टोला

संजय राऊत

लॉकडाऊन असतानाही देशातील नागरिक बेजाबदारपणे वागत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टि्वट करुन आपली नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या टि्वटचा समाचार घेतला आहे. भीती आणि चिंतेच्या या वातावरणाला तुम्हीच उत्सवांच स्वरुप दिलंत. मग दुसरं काय होणार, असा टोला लगावला. 

डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता कळलं असेल- राज ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना रविवारी (दि. २२ मार्च) 'जनता कर्फ्यू'ची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता आणीबाणीच्या क्षणी काम करणाऱ्यांप्रती आभार मानण्यासाठी घराबाहेर येत टाळ्या वाजवणे, घंटी वाजवणे, ताट घेऊन ते वाजवण्यासही सांगितले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता काही नागरिकांनी कोणतीही खबरदारी न घेता गर्दी करत हा उपक्रम पार पाडला होता. तसेच काही लोकांनी जनता कर्फ्यूची तमा न बाळगता रस्त्यावरुन फिरण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी टि्वटरवर नाराजी प्रकट केली होती. 

कोरोना: नवी मुंबई आणि पुण्यातील बाजार समिती ३१ मार्चपर्यंत बंद

पंतप्रधान मोदींच्या या टि्वटचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. आमच्या पंतप्रधानांना चिंता आहे की, लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीत. प्रिय पंतप्रधानजी, तुम्ही भीती आणि चिंतेच्या या वातावरणालाही उत्सवाचे स्वरुप दिले आहे. तेव्हा असे होणारच. सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर असेल, असे टि्वट करुन त्यांनी मोदींना टोला लगावला.