पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना नेत्याचे मोहन भागवतांना पत्र, गडकरींना पाठविण्याची मागणी

मोहन भागवत

राज्यात सत्ता स्थापन करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोणताही तोडगा निघत नसतानाच आता शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले असून, त्यांच्याकडे यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिवसेनेशी वाटाघाटी करण्यासाठी राज्यात पाठवा, अशीही मागणी त्यांनी केली.

आमदार फुटण्याची भीती नाही, बाळासाहेब थोरात यांना खात्री

मुख्यमंत्रीपदासह इतर सत्तापदांचे ५० - ५० टक्के वाटप करण्याची शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी गेल्या काही दिवसांपासून थांबल्या आहेत. एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत रोज भाजपवर दबाव टाकण्यासाठी वेगवेगळी विधाने करीत असताना आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षांमध्ये सत्ता स्थापन करण्यावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी आता मोहन भागवत यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.

महाराष्ट्रात जो तिढा निर्माण झाला आहे तो नितीन गडकरी सोडवू शकतील. त्यामुळे त्यांनाच शिवसेनेशी वाटाघाटी करण्यासाठी मुंबईत पाठवावे, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. 

आता रडायचं नाही तर लढायचं; उद्धव ठाकरेंकडून शेतकऱ्यांना धीर

राज्यात पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना केला. त्याचबरोबर लवकरच राज्यात शपथग्रहण सोहळा होईल आणि महाराष्ट्राला लागलेले ग्रहण सुटेल, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivsena leader kishore tiwari writes to mohan bhagwat on formation of government in maharashtra