पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अरे! ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...'

काँग्रेसने बोलावलेली विरोधकांची बैठक

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात काँग्रेसने सोमवारी दिल्लीत बोलाविलेल्या विरोधकांच्या बैठकीला काही राजकीय पक्षांनी उपस्थिती न लावल्यामुळे आता हाच मुद्दा भाजपच्या नेत्यांनी पुढे आणला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी याच मुद्द्यावरून एका वाक्यात काँग्रेसवर टीका केली. 'अरे ये गँग तो बनने से पहले ही टुकडे टुकडे हो गया...' असे वाक्य लिहित त्यासोबत सोमवारच्या विरोधकांच्या बैठकीचा फोटो त्यांनी आपल्या हँडलवरून ट्विट केला. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

मोदी सरकारविरोधात पुढील रणनिती ठरविण्यासाठी काँग्रेसने सोमवारी सर्व विरोधी पक्षांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला वेगवेगळ्या कारणांमुळे सहा राजकीय पक्षांनी उपस्थिती लावली नाही. यामध्ये तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष आणि द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांचा समावेश आहे. या प्रमुख पक्षांच्या अनुपस्थितीमुळे मोदी सरकारविरोधात विरोधकांची एकी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर टीका केली.

कुटुंब सोडून पळालेल्या पतीला पत्नीकडून कोर्टातच मारहाण

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांकडून आपल्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचे सांगत तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गेल्या आठवड्यातच या बैठकीवर बहिष्कार घालणार असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसकडून आपल्या पक्षाच्या आमदारांना फोडले गेल्यामुळे नाराज झालेल्या मायावती यांनी सोमवारी या बैठकीमध्ये सहभागी न होण्याचे जाहीर केले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे आम आदमी पक्षानेही या बैठकीकडे पाठ केली.