पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेत शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, संजय राऊत भडकले

संजय राऊत

एनडीएतून बाहेर काढण्याबरोबरच राज्यसभा सदस्यांची आसनव्यवस्था बदलल्यामुळे शिवसेनेतून संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला जाणूनबुजून दुखावण्यासाठी आसनव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी कोणाच्या तरी सांगण्यावरुन हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे. राऊत यांची तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे राऊत यांनी आपली आसनव्यवस्था पूर्वीप्रमाणेच करण्याची मागणी केली आहे. 

PM मोदींसोबतच्या चर्चेत शरद पवारांनी या मुद्द्यांवर दिला भर

संजय राऊत हे २००४ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेतेही आहेत. एनडीए विरोधात असतानाही त्यांची आसनव्यवस्था ही तिसऱ्या रांगेत होती. मात्र महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आणि त्याची परिणिती लगेचच दिसून आली. शिवसेना एनडीएत नसल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी केली. त्याचबरोबर त्यांच्या आसनव्यवस्थेत बदल करण्यात आला. गेली अनेक वर्षे तिसऱ्या रांगेत ३८ व्या क्रमांकावर बसणाऱ्या राऊत यांना थेट पाचव्या रांगेतील १९९ क्रमांकावर करण्यात आली. यामुळे राऊत हे प्रचंड चिडले. शिवसेनेला जाणूनबुजून दुखावण्यासाठीच कोणाच्यातरी सांगण्यावरुन हा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. 

काश्मीरमध्ये स्थिती सामान्य, योग्यवेळी इंटरनेट सुरु होईलः शहा

आम्हाला काहीही न सांगता एनडीएतून काढण्यात आले. हा निर्णय सभागृहाच्या प्रतिष्ठेवर परिणाम करणारा आहे. माझी पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेत बसण्याची व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो, असे राऊत यांनी नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shiv Senas Sanjay Raut write a letter to Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu for changing seating arrangement