पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिरासाठी अध्यादेश हीच आमची इच्छाः उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे (ANI)

राम मंदिर होणारच असून त्यासाठी अध्यादेश हीच आमची इच्छा आहे. लवकरात लवकर राम मंदिर होईल याचा पूर्ण विश्वास आम्हाला आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येतील रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लांचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अयोध्यावासियांना दिलेला शब्द पाळला आहे. निवडणुकीनंतर रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी येईल असे म्हटले होते. त्यानुसार सर्व खासदारांना घेऊन आलो आहे. रामलल्लांचे दर्शन घेऊन शिवसेनेचे खासदार उद्या संसदेत पाय ठेवणार आहेत. ही जागाच अशी आहे की, येथे सारखे सारखे यावे वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. आता सरकार मजबूत असून आम्ही सर्वजण एकत्र आहोत. हा निर्णय घेण्याचे धाडस मोदींकडे आहे. सरकारने राम मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला तर तो रोखण्यासाठी कोणीही येणार नाही, असेही उद्धव म्हणाले.