पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर काडीमोड!, शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

उद्धव ठाकरे आणि अमित शहा

शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणेची औपचारिकता भाजपने रविवारी केली. महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरुन युतीत वितुष्ठ निर्माण झाल्यानंतर शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सांवत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, युती तुटल्याची दोघांकडून अधिकृत घोषणा कोणी केली नव्हती. त्याचबरोबर भाजपने संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित एनडीएच्या बैठकीला शिवसेनेला धाडले नव्हते. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा करण्याची औपचारिकताच राहिली होती. ती कसर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर ही घोषणा केली आणि शिवसेनेला आता विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था केल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रल्हाद जोशी म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही खासदार एनडीएच्या बैठकीला आला नाही आणि त्यांच्या मंत्र्यानेही राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत त्यांची विरोधी बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

दरम्यान, शिवसेना नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिवसेनेला कोणी शहाणपण शिकवू नये, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फटकारले.